Type Here to Get Search Results !

रहाटगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा आनंदोत्सव

 *



*

       अमरावती येथील सामान्य रुग्णालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संबधित कायदेशीर लढा स्मारक समितीने जिंकल्याने पुढील विस्ताराचा मार्ग मोकळा झाला त्याबद्दल रहाटगाव येथील आंबेडकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने येथे आनंदोत्सव दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजत साजरा करण्यात आला.

        या प्रसंगी आंबेडकरी नेते मस्छिंद्र राऊत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, शहर अध्यक्ष रियाज खान, कोअर कमिटी मेंबर डॉ. पद्माताई राजपूत, अफसर भाई, जीवन पचगाडे यांच्या नेतृत्वात राहाटगावच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला.

     त्यानंतर येथील डॉ. बाबासाहेब स्मारक सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी मस्छिंद्र राऊत, प्राचार्य डॉ. राजपूत, राजेंद्र आगरकर, रियाज खान, गुणवंत वाहने, भीमराव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मस्छिंद्र राऊत यांनी सांगितले की आम्ही सदैव विदर्भ राज्य आंदोलन समितीसोबत आहोत कारण आमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतंत्र विदर्भ राज्यात दडलेले आहे आणि आम्ही ते मिळवणारच ! 

      यावेळी सचिन वानखेडे, संकेत चौधरी, प्रवीण वाकोडे, गजानन चक्रे, निलेश मोहोड, अजय वानखेडे, सूरज इंगळे, आशिष डोंगरे, किशोर वासनिक तसेच अनेक विदर्भवादी ग्रामस्थ सभेला उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments