अमरावती : डॉ. चाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 14 वर्षांनंतर सोमवार (दि. 13) आंबेडकरी अनुयायांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाचे आंबेडकरी समाज व विविध संघटनांनी उत्स्फूर्त स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर वेधील न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोड यांच्या द्विसदस्यीय पीठाने निकाल दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड, यश आर. सवाईफूल व अॅड. शशिभूषण वाहणे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारार्पण व अभिवादन केले तसेच फटाके फोडून व एकमेकांना शुभेच्छा देत,
पेड़े भरवत विजवाचा आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच उपविभागीय अधिकारी अनित्त भटकर वांची भेट घेऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. स्मारकाच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले.उच्य न्यायालयाच्या निर्णयानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आवश्यक जगा अमरावतीमहानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे आंबेडकरी समाजात आनंदाचे वातावरण असून, 14 वर्षांपासूनची स्मारकाची मागणी प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments