Type Here to Get Search Results !

असेलविठ्ठल कोणाच्या प्रतीक्षेत____*आता विठ्ठल

 ____*आता

विठ्ठल कोणाच्या प्रतीक्षेत____*आता विठ्ठल कोणाच्या प्रतीक्षेत उभा  ?*______

*’युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी’* अशी विठ्ठलाच्या प्रतीक्षेची महिमा सांगितल्या जाते. एवढा काळ हा विठ्ठल कोणाच्या प्रतीक्षेत उभा असेल? याचा आढावा घेत गेल तर लक्षात येते की, या प्रतीक्षेचे रहस्य भक्त पुंडलिकांच्या कथेत दडले आहे. एकदा विठू माऊली भक्त पुंडलिकाच्या भेटीला गेले असता पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करीत होता. भक्त पुंडलिकाने त्याची सेवा पूर्ण होईपर्यंत विठ्ठलास थांबण्यास सांगितले. त्यांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली. तेव्हापासून हा आपला विठ्ठल त्याच्या प्रतीक्षेत उभा आहे, असं सांगितले जाते. या कथेचा मतितार्थ असा की, आपल्या कर्तव्यात लीन असलेल्या माणसाची वाट देव सुद्धा पाहतो. तुमच्या कामातच देव आहे आणि ईश्वर प्राप्तीचे मूळ हे सात्विक जीवन जगण्यात सुद्धा आहे. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यांचे सत्व या भूमीत पेरल्या गेले आहे. त्यांची शिकवण कायमच महाराष्ट्राला दिशादर्शक राहिली आहे. या संतांच्या मांदियाळी पहिले नाव येथे ते संत सावता यांचे. पंढरपूर पासून जवळ असलेल्या अरण या गावचे ते. पण विठ्ठल दर्शनाला ते कधीच गेले नाही. त्यांना त्यात रस नव्हता असे नाही, तर त्यांच्या भक्तीचा मार्ग निरळा होता. तो म्हणजे कर्म सिद्धांताचा. *”कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी”* असे म्हणत त्यांनी आपल्या मळ्यात आलेल्या पिकात देव पाहिला आणि शेतकर्माला आपली वारी मानले. सावतोबा म्हणतात की, “आपली कर्तव्य आणि कार्य करीत राहणे हीच खरी ईश्वर भक्ती.” *”स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात.”* कर्म पूजेचा हा मंत्र त्यांनी ७५० वर्षीपूर्वी जगाला दिला आणि कर्मविष्काराचे महाराष्ट्रातील आद्य उदाहरण ठरले. तेव्हा या भक्तश्रेष्ठाला भेटण्यासाठी खुद्द विठ्ठल त्यांच्याकडे गेले असल्याचे आपण संत एकनाथांच्या अभंगातून पाहतो. 

इथे विठ्ठलाला प्रतीक्षा आहे ती, कर्मात देव पाहणाऱ्या संत सावताची. ज्यांनी भक्ती आणि भक्तीचा मार्ग स्थापित होत असताना प्राधान्याने कर्मालाच भक्तीचे स्वरूप दिले. पुढे संत जनाबाईने याच काळात आपल्या गृह कार्याला भक्तीचे स्वरूप देत रोजच्या घर कामातून ईश्वराची आराधना केली. त्यांचे मानने होते की, ईश्वर फक्त देऊळात नसून तो तुमच्या रोजच्या कामात सुद्धा वसला आहे. येथे भक्तीचा साधा आणि सरळ मार्ग पाहावयास मिळतो. त्यानंतर दर्शन होते ते संत नामदेवाचे. ज्यांनी आपल्या निस्सिम विठ्ठल भक्तीला महाराष्ट्र बाहेर नेऊन या विठ्ठलाला सर्वांच्या हृदयात विराजमान केले. यासाठी त्यांच्या भक्तीला कोणत्याच सामाजिक व भौगोलिक मर्यादा आल्या नाहीत. डोळस श्रद्धा आणि सत्यभाव सर्वमान्य असतो. संत ज्ञानेश्वरही याच काळात होऊन गेले. ज्यांनी सर्वसामान्यांच्या भक्तीला *ज्ञानेश्वरीच्या* माध्यमातून मार्ग मोकळा करून दिला. शतकांपासून दडलेले ज्ञान, सामान्य स्वरूपात, सामान्य भाषेतून मांडले. पुढे संत चोखामेळा सामाजिक विषमतेवर बोलून गेले. त्यांनी सामाजिक समानतेसाठी प्रश्न उभा केला. त्यांचे म्हणणे होते की, सोबतच्या माणसाला माणूस म्हणून पाहिले जात नसेल तर तुमच्या ईश्वर समर्पणाला काय किंमत आहे? भक्त हा सर्वांना समान दृष्टीने पाहणारा असावा, तीच खरी भक्ती. याच तेराव्या शतकात संत गोरोबा कर्मरुपी भक्तीलाच स्विकारताना दिसतात. त्यांनीही आपला विठ्ठल त्यांच्या नित्य कर्तव्यात पाहला. संत सेना यांनी सुद्धा संत सावता, जनाई, गोरोबा सारखेच स्वकर्माला भक्तीचा मार्ग म्हणून स्वीकारले आणि त्यातच आपल्या ईश्वराला शोधले. त्यांचे म्हणणे होते की, कोणत्याच पारंपारिक व्यावसायिक कर्माने माणसाचे मूल्य कमी होत नाही. 

या तेराव्या शतकातील संतांची शिकवण पुढे संत एकनाथाच्या भूतदयेपर्यंत येऊन पोहोचलेली दिसते. धार्मिक विधींपेक्षा मानवता, दयाधर्म या गोष्टींना त्यांनी स्थान दिले. समाज प्रबोधनासाठी अनेक भारुडे रचलीत. त्यानंतर संत तुकारामांनी मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या अभंगातून मांडले. सहज मार्गातून आपल्या भक्तीला संतत्वाकडे घेऊन गेले. *”जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेंची जाणावा”* या मूलमंत्रातून रंजल्या गांजल्यांच्या सेवेतच ईश्वरप्राप्ती असल्याचे सांगितले. सर्वांसाठी परत मानवतेचा मार्ग स्पष्ट केला. वरील संतांची शिकवण हीच की, ईश्वर हा मानवसेवा, स्वकर्म, कर्तव्य, दयाभाव, माणुसकी, मानवता आणि सामाजिक समता यातच दडलेला आहे. त्यांनी अंगीकारलेली आणि सांगितलेली ही सामाजिक समानता त्यावेळेस कोणतेही मानवी मूल्य अधोरेखित नसताना दिलेली आहे. माणूस म्हणून जगतांना, सामान्य माणसाला त्यांनी दिलेले मुल्य वाखण्याजोगे आहे. तसेच स्वकर्तव्यातून केलेली ही भक्ती कर्मविष्काराची प्रचिती आहे. त्यांनी विठ्ठलाला प्रतीक म्हणून केलेली सेवा आणि दिलेला कर्मभाव, सर्व विठ्ठल भक्तास आदर्श स्थानी आहे. यामुळेचं आपला विठ्ठल या लोकांच्या शोधात आणि प्रतिक्षेत होता. 

         या संतांनी तत्कालीन समाज व्यवस्थेत राहून, परंपरागत मार्ग सोडून समाज व्यवस्थेला प्रश्नांकीत करीत आपले भक्तिमार्ग स्थापित केलेत. त्यांच्या रचलेल्या अभंगांनी पूर्वापार चालत आलेल्या कट्टर प्रथेला आव्हानीत करीत पारंपारिक व्यावसायीक कर्मातून भक्ती मार्ग जगाला दिला. सेवा, कर्तव्य, भक्ती आणि नैतिकतेच्या जोरावर आपल्या ईश्वर भक्तीचा ठसा सर्वत्र उमटविला. या संतांची शिकवण लाभलेला हा गौरवशाली महाराष्ट्र. आता इथे विठ्ठल कोणाच्या प्रतीक्षेत असेल? हा पडलेला प्रश्न अनेक बाजूंनी बोलून जातो. अनेक पैलू  उलगडायला लावतो. आजची समाजव्यवस्था शिक्षित असताना देखील गोष्टींकडे पाहण्याची तार्किकता धूसर होत चालली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला पडून भावनिक दृष्टिकोनाकडे समाज जीवन झुकते आहे. संतांनी दिलेल्या शिकवणीचे धडे गिरविल्या जात नसल्याने, त्यांच्या सेवेचा आदर्श, कर्मसिद्धांत, मानवता, दयाभाव, सामाजिक समानता, कर्मश्रेष्ठता या गोष्टींची शिकवण लोप पावत चाललेली दिसत आहे. तेव्हा असे लक्षात येते की, *’विठ्ठल का प्रतीक्षेत उभा आहे’.* कदाचित नवयुग आरंभाच्या प्रतीक्षेत् तर उभा नसेल? जिथे भक्ती डोळस असेल, वैश्विक सामाजिक समानता असेल,  विनायता दयाभाव असेल आणि तार्किकतेचा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल.

प्रा. डॉ. दिपक घोडेकर 

९४०३२५३३२५ उभा असेल ?*______

९४०३२५३३२५

Post a Comment

0 Comments