अमरावती:
भारतीय जन संचार संस्थान (आयआयएमसी) मध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी सोमवार दिनांक २७ जुलै रोजी थेट प्रवेशाची अंतिम संधी देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज गूगल फॉर्म द्वारे किंवा आयआयएमसीच्या अमरावती कार्यालयात येऊन भरता येईल.
थेट प्रवेश फेरी अंतर्गत नोदणी प्रक्रिया सुरु असून ती दिनांक २६ जुलै पर्यंत सुरु राहील. सोमवारी २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा भारतीय जन संचार संस्थानच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पश्चिम क्षेत्रीय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. मराठी पत्रकारितेत पी. जी. डिप्लोमा हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून तो पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि मीडियाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रवेश करीता वयोमर्यादेची अट असून अनारक्षित प्रवार्गासाठी २५ वर्ष, ओबीसी करीता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करीता ३० वर्ष आहे.
इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज व गूगल फॉर्म लिंक करीता आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट https://iimc.gov.in/language-
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments